विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे कोराडीत उर्जामंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

१० ऑगस्ट २०१९

विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे कोराडीत उर्जामंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन

पळाले रे पळाले, बावनकुळे पळाले'

अनिकेत मेश्राम/कोराडी:
वीजदर निम्मे करा', 'कृषिपंपाचे बिल माफ करा', या मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने राज्याचे ऊर्जा व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानावर 'वीज व विदर्भ मार्च' काढण्यात आला. त्यानंतर मंत्र्यांची भेट न झाल्याने 'पळाले रे पळाले, बावनकुळे पळाले' अशी घोषणा देत संतप्त आंदोलनकर्त्यांनी कोराडी महामार्गावर सुमारे दीड तास चक्काजाम केला. 

दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन आवाज दाबला, असा आरोप समितीच्या नेत्यांनी केला


चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार दिवसांपूर्वीच भेटून निवेदन स्वीकारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, 'आज ते गावात नाहीत. वर्धा येथून त्यांनी फोनवर चर्चा केली व एका तासात येतो, असे सांगितले. परंतु, त्यापूर्वीच पोलिसांनी लाठिहल्ला केला. बळजबरीने आंदोलनकर्त्यांना हुसकावून लावले. यात सविता वाघ या खाली पडल्या व बेशुद्ध झाल्या. तुकेश वानखेडे यांच्यासह अन्य सहा-सात महिला व शेतकऱ्यांनादेखील मार लागला', असा आरोप नेवले यांनी केला.

 समितीच्या प्रमुख मागण्या
विदर्भातील शहरी, ग्रामीण, शेतकरी, व्यापारी, उद्योजक ग्राहकांच्या विजबिलाची रक्कम निम्मी करा, शेतकरी वर्षातून सरासरी १०० दिवस विजेचा वापर करतो, त्यापोटी केंद्र सरकारकडून राज्य शासनाला अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांची कृषिपंपाच्या वीज बिलातून मुक्ती करावी, विदर्भात दररोज ६,३०० मेगावॅट वीजनिर्मिती होते आणि वापर केवळ २२०० मेगावॅट आहे. वीज उत्पादनात जमीन, कोळसा, पाणी, वापर विदर्भातील होत असून प्रदूषणाचा मात्र नागरिकांना सामना करावा लागतो. कृषिपंपाचे १२ ते १६ तासांचे लोडशेडिंग तातडीने बंद करावे, देशातील इतर राज्यात वीज स्वस्त असून सर्वांत महागडी वीज महाराष्ट्रात आहे. ज्या दिल्ली राज्यात वीजनिर्मिती होत नाही, तिथे सर्वांत स्वस्त विज आहे. दिल्ली राज्याचे दर विदर्भात लागू करावे, औष्णिक वीज प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करावे, नागपुरातील वीजग्राहकांची लूट करणारी कंपनी तातडीने बरखास्त करावी, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची कार्यवाही तातडीने सुरू करावी, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या निवेदन देताच अनेक कार्यकर्तेना अटक करण्यात आली़.

  आंदोलनाचे नेते वामनराव चटप मुख्य संयोजक राम नेवले महिला आघाडीच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षा रंजना मामडे युवा आघाडी नागपुर विभाग प्रमुख मुकेश मासुरकर  मधुसूदन हरणे,  विद्या गिरी,  अभिजित लाखे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

           आंदोलनात संदीप ठाकरे, नरेंद्र कातडे, राजू तेलहांडे, गणेश मुटे, कैलास घोडे, सचिन ठवरी, लक्ष्मीकांत सेनाड, सविता घोडे, प्रा. महेश माकडे, भारत पाटील, पंकज साबळे, पुंडलिक हुडे, राजू नगराळे, नितीन सेलकर, रोहित हरणे, गणेश बोरकर, पंकज पुसदेकर, विजय धोटे, शुभम तुळणकर, विजय किलनाके, दीपक मुजबैले, अजय मुळे, नरेंद्र हरणे, वामनराव चौधरी, आशीष धोटे, निखिल किलनाके, रमेश तेलहांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.