कोरपन्यात बकरी ईद उत्साहात साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

१३ ऑगस्ट २०१९

कोरपन्यात बकरी ईद उत्साहात साजरी

कोरपना/प्रतिनिधी:

परमेश्वराची निष्ठा ,त्याग समर्पण व बंधुत्वाची सदेश देणारी ईद -उल-अजहा अर्थात  बकरी ईद शांततेत साजरी करण्यात आली. मोठया संख्याने मुस्लिम बांधवानी ईदगाह मैदान बिबी येथे ९ वाजता ईद उल अ ज्हा ही नमाज अदा करण्यात आली.

ईदगाह मौलाना अमन रजा सहाब यांनी नमाज पढविली. तत्पूर्वी त्यांनी ईदचे महत्त्व विषद केले. ईद त्याग व बल‌िदानाची शिकवण देणारी आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी कोल्हापुर व सांगली मधील पुरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्यात आली.नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवानी एकमेकांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.तसेच बकरी ईद चे औचित्य साधुन कब्रिस्तान बिबी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

मुस्लिम बांधव मोठया संख्याने उपस्थित होते. ईदनिमित्त मुस्लिमांनी नमाज पठण झाल्यानंतर नातेवाईक व मित्रमंडळींना शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांन शुभेच्छा देण्यासाठी  तालूका ग्रामीण पत्रकार संघ कोरपना उपाध्यक्ष हबीब शेख,टिपु सुल्तान फाऊंडेशन सदस्य अक्रम शेख, पिंजारी कमेटी चे सद्स्य शकील शेख,रहीम शेख ,गौस सिद्दीकी,  पोलीस स्टेशन गडचांदुर,व सर्व राजकिय पक्षाच्या नेत्यांनी आदी सह हिंदू बांधवांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या.