नाशिकात महानिर्मिती कंपनीच्या राज्यस्तरीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाटय स्पर्धेचे भव्य आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

१७ ऑगस्ट २०१९

नाशिकात महानिर्मिती कंपनीच्या राज्यस्तरीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाटय स्पर्धेचे भव्य आयोजन

१९ ऑगस्टला उदघाटन
२३ ऑगस्टला समारोप 
नाशिक/प्रतिनिधी:

 नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे तर्फे कालीदास कलामंदिर, नाशिक येथे  १९ ते २३ आॅगस्ट २०१९ या कालावधीत करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन १९ ऑगस्ट रोजी  सकाळी ९.३० वाजता  महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंह (भा.प्र.से.), यांच्या शुभ हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक वी.थंगपांडीयन, वित्त संचालक संतोष आंबेरकर उपस्थित राहणार आहेत. 

या प्रसंगी सांघिक नियोजन व संवादचे कार्यकारी संचालक सतीश चवरे, राख आणि सौर उर्जा चे कार्यकारी संचालक  कैलास चिरूटकर, माहिती तंत्रज्ञान कार्यकारी संचालक  नितिन चांदुरकर, प्रकल्प कार्यकारी संचालक  संजय मारूडकर यांची विषेश उपस्थित लाभणार आहे.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २३ ऑगस्ट रोजी महानिर्मितीचे संचलन संचालक चंद्रकांत थोटवे याचे अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खनिकर्म संचालक  पुरुषोत्तम जाधव उपस्थित रहाणार आहेत. या प्रसंगी मानव संसाधनचे कार्यकारी संचालक भीमाशंकर मंता, कोळसा आणि गरेपालमा कार्यकारी संचालक  राजु बुरडे,  मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे हे प्रामुख्याने उपस्थित रहाणार आहेत. 

पारितोषिक वितरणावेळी विशेष  अतिथी म्हणून सुप्रसिध्द सिने नाटय अभिनेता सयाजी शिंदे  सुप्रसिदध मराठी चित्रपट "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा" फेम हे समारंभाचे विशेष आकर्षण राहणार आहे.

या स्पर्धे दरम्यान विविध विज निर्मिर्ती केंद्रांतर्फे एकुण १० नाटय प्रयोगांचे  सादरीकरण होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नाशिक, कोराडी, खापरखेडा, परळी, भुसावळ, पारस, चंद्रपुर हे औष्णिक वीज केंद्र तर  पोफळी जल विद्युत केंद्र आणि उरण वायु विद्युत केंद्र तसेच सांघिक कार्यालय, मुंबई हे संघ सहभागी होणार आहेत.

या नाटय पर्वणीचा नाशिक नगरीतील नाटय रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा, प्रवेश नि:शुल्क. तरी नाट्य रसिकांनी या नाटय महोत्सावास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष तथा नाशिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता  उमाकांत निखारे यांनी केले आहे.