पोळ्यानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 होणार लागू होणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

२४ ऑगस्ट २०१९

पोळ्यानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 होणार लागू होणार

22 ते 25 ऑगस्ट दरम्यान योग्य निर्बंध व 
निर्देश देण्याचे अधिकार पोलीस ठाण्यांना प्रदान
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यात पोळा सणानिमित्य सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2019 दरम्यान जिल्ह्यात कलम 36 लागू केले असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले. त्यासंबंधीचे निर्देश जारी करण्यात आले आहे.


येत्या 30 व 31 ऑगस्ट 2019 रोजी जिल्ह्यात पोळा व तान्हा पोळा सण साजरा होत असून या कालावधीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस अधीक्षकांनी दिनांक 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत कलम 36 जिल्ह्यात लागू केले आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजवणे, सभेचे आयोजन मिरवणूक काढणे, त्याठिकाणी रस्ते निश्चित करणे, लाऊड स्पीकर वापरणे, योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. तसेच सदर आदेश लागू असताना सभा मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊडस्पीकर वाजवणे, मिरवणुकीत नारे लावणे,मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

कलम 33, 35 ते 40 व 45 या या कलमान्वये काढण्यात आलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी या सर्व निर्देशाचे पालन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोलीस यंत्रणेला दिलेले आहे.