बळसाणे आजी माजी पुढाऱ्यांसह ग्रामस्थांडून बुराईला साडी, चोळी खणाचा आहेर भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०५ ऑगस्ट २०१९

बळसाणे आजी माजी पुढाऱ्यांसह ग्रामस्थांडून बुराईला साडी, चोळी खणाचा आहेर भेटआपल्यासाठी घेऊन येत आहोत खबरबात 

 सौ.मनिषा कोचर / धुळे
    8888965296

बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे वासियांची मुख्य जीवनदायीनी समजली जाणारी *बुराई नदी* प्रवाहीत होऊन नदीचे रविवारी सकाळी गावापर्यंत पोहचले
   तालुक्यातील बळसाणे येथून जाणारी *बुराई नदीला* या वर्षी प्रथमतः च पाणी आल्याने ग्रामस्थांनी पुर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान गावाचे आजी माजी पुढाऱ्यांसह ग्रामस्थांच्या वतीने *बुराई नदीचे* शास्त्रीय पुरातना नुसार येथील उमाकांत भट यांनी विधीवत मंत्राने जलपूजन केले 
  बुराई नदीचा उगम असणाऱ्या बळसाणेसह परिसरात गेल्या ४ ते ५ दिवसापासून संततधार पाऊस असल्याने *बुराई नदी* वाहती झाली आहे यामुळे बळसाणेसह माळमाथ्याच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे
  बळसाणे लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग राजपूत , पोलिस पाटील आनंदा हालोरे , हिम्मत खांडेकर , नवल पाटील , रतनसिंग गिरासे , लक्ष्मण मासुळे , अजबसिंग गिरासे , अशोक जैन , शेरसिंग गिरासे , जितेंद्र गिरासे , सुकदेव पाटील , नाना सिसोदे , अशोक राजपूत , आण्णा हालोरे व शास्त्रोक्त पंडित उमाकांत भट , भैया मिस्तरी आदी ग्रामस्थांनी एकंदरीत येवून *बुराई नदीवर* जाऊन  नदीचे विधीवत पूजन करून *बुराई नदीला* येथील पो.पा. आनंदा हालोरे व लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग राजपूत , हिम्मत खांडेकर व उपस्थितांच्या हस्ते *साडी , चोळी , खण ,नारळ विधीवत पूजा करून अर्पण करण्यात आले त्याच प्रमाणे माळमाथ्याचे बंधारे ही वाहते झाल्याचे दिसून येत आहे कमी पावसात ही नदी वाहती झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जाते आहे सतत दोन , तीन पावसाचे प्रमाण असेच राहिले तर *बुराई नदी* मोठ्या प्रमाणात वाहू लागेल बळसाणे व माळमाथा परिसरात रिमझिम पाऊस पडत असल्याने *बुराई नदी* वाहू लागली पण *बुराई धरण* ही ओव्हर प्लो झाल्याचे दिसून येत आहे संततधार पावसामुळे नदी , नाले , बंधारे वाहते झाले आहे पाऊस झाल्याने शेतीकामांना वेग येणार आहे