19 ते 21 ऑगस्ट दरम्यान चंद्रपुरात राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा प्रदर्शनीचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०९ ऑगस्ट २०१९

19 ते 21 ऑगस्ट दरम्यान चंद्रपुरात राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा प्रदर्शनीचे आयोजन

         पॉवरसिटी फोटोग्राफर्स क्लब चंद्रपूरचे आयोजन
चंद्रपूर /प्रतिनिधी

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त पॉवेरसिटी फोटोग्राफर्स क्लब चंद्रपूरच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन दि. १९,२० व २१ ऑगस्टला स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहाच्या लता मंगेशकर कला दालनात आयोजित करण्यात आली आहे.

सदर स्पर्धा प्रदर्शनीला उदघाटक म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तर प्रमुख मार्गदर्शक
म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त छायाचित्रकार मा. नल्लामुधू उपस्थित राहणार आहेत. सदर स्पर्धा
प्रोफेशनल व हौशी अशा दोन गटात विभागण्यात आली आहे. प्रोफेशनल गट स्पर्धेसाठी वेडिंग व नेचर आणि वाइल्ड लाईफच्या विषय ठेवण्यात आला असून स्पर्धकांनी १२ बाय १८ इंच आकाराचे तर होशी गटात आपल्या आवडीचे कोणतेही छायाचित्र ८ बाय १२ इंच आकारामध्ये सादर करणे बंधनकारक राहील. प्रत्येक गटात जास्तीत जास्त ४ छायाचित्र पाठविता येतील. प्रोफेशनल गटात प्रति छायाचित्र ३००
रूपये शुल्क तर हौशी गटाला २०० रूपये प्रति छायाचित्र शुल्क आकारण्यात येणार आहे. विजेत्या प्रोफेशनल गटाला अनुक्रमे अकरा हजार, सात हजार, पाच हजार तर हौशी गटाला अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपये रोख व शिल्ड असे बक्षीस देण्यात येणार आहे.

इच्छुक स्पर्धकांही आपले छायाचित्र प्रवेशिका श्री साई डिजिटल वर्ल्ड, भागवत आर्केड, सिविल लाईन्स नागपूर रोड, चंद्रपूर या पत्त्यावर किंवा powercityphotographers@gmial.com या संकेतस्थळावर १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत पोहोचतील या बेतानं पाठवावे, असे आव्हान पॉवरसिटी फोटोग्राफर्स क्लब
चंद्रपूरचे देवानंद साखरकर व गोलू बाराहाते यांनी केले आहे. तरी अधिक माहिती साठी राहुल चिलगीलवार , रोहित बेलसरे , शशांक मोहरकर , परीक्षित केदारपवार , करण तोगट्टीवार ,अमोल मेश्राम, विशाल वाटेकर व टिंकू खाडे यांच्याशी संपर्क साधावा.

|