बळसाणेसह माळमाथेत पाऊस जोरात; पिके कोमात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०७ ऑगस्ट २०१९

बळसाणेसह माळमाथेत पाऊस जोरात; पिके कोमातमाळमाथेत २ ते ३ दिवसापासून सुर्यदर्शन नाही

आपल्या साठी घेऊन येत आहोत खबरबात

खबरबात / गणेश कोचर , धुळे
8888965296

बळसाणे : बळसाणेसह माळमाथा परिसरात संततधार होणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे पावसाचे पाणी शेतात घुसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून नियमितपणे रिमझिम टपकणाऱ्या पावसामुळे उबदार झालेली पिके सडू लागली आहेत. बळसाणे व परिसरातील नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बळसाणे व माळमाथा परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. 

बुराई नदी काठाची शेते पाण्याखाली नियमितपणे होणाऱ्या पावसामुळे बुराई नदी काठाची शेते पाण्याखाली गेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी च चंद्रभागा बाई पांडुरंग लोणारी या वयोवृद्ध विधवा महिलेचा लावलेला कापसाची झाड पूर्णतः वाहून गेली आहेत. यापूर्वीची लावलेली झाडे सडू लागली आहे पुराचे पाणी ओसरल्यावर बळसाणे व परिसरातील नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
  

जास्त पावसाने केले उबदार पिकांचे नुकसान साक्री तालुक्यातील बळसाणे व माळमाथा परिसरात १० ते १२ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतातील नानातऱ्हेच्या पिकांसह भाजीपाल्यांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे यागोष्टीचा सर्वाधिक फटका येथील शेतकरी *चंद्रभागा बाई लोणारी या वयोवृद्ध विधवा आजीबाई ला बसला आहे* दरम्यान *बळसाणे , आगरपाडा , कढरे , सतमाने , आयणे , उंभड , नागपूर , फोफरे , घानेगाव , मळखेडा , लोणखेडे , छावडी , म्हसाळे , अमोदे , ऐचाळे , इंदवे , दुसाने , हाट्टी (बु) , हाट्टी (खु) , डोंगराळे आदी माळमाथा भागातील शेतकऱ्यांना बसला आहे*
बुराई नदीच्या परिक्षेत्रात रविवारी झालेल्या जोरदार पावसात बुराईचे पाणी थेट शेतात जाऊन मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. यात पिकासह शेतातील मातीही वाहून गेली.  शिवारात  फरशी पाणी थेट शेतात जाऊन पिकासह शेतातील काळी कसदार माती वाहून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना घडली. यात बळसाणे येथील चंद्रभागाबाई पांडुरंग लोणारी या विधवा वयोवृद्ध महिलेची कपाशी पुर्णपणे वाहुन गेली,त्यांच्या मालकीची बळसाणे शिवारातील गट नंबर 257  मधील 32 गुंठा क्षेत्र होते. त्यात त्यांनी शेतात शेणखत, बियाणे, इतर खते व गाळ टाकला होता. त्यात त्यांचे एक ते दोन लाख रुपये खर्च झाले होते. हा झालेला खर्च व येणारे उत्पन्नावर नदीचे पाणी थेट शेतात गेल्याने  मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाली आहे. बुराई नदीला आलेला महापुराने प्रवाहाने नदी विरुद्ध दिशेने वाटचाल केल्याने हे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक-यांसह इतर शेतक-यांनी केली आहे. 
 पिकांमध्ये पाणी साचल्याने कापूस, मका, कांदा, दादर , बाजरी , भुईमूग आदी पिके सडू लागली आहेत याकारणाने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव ही वाढला आहे बळसाणे गावातील महिला शेतकरी ग.भा.चंद्रभागा बाई लोणारी यांच्या शेतात पाणी साचल्याने कापसाची झाड जमिनीवर पडली असून ती झाड सडू लागली आहे हे द्रुश्य पाहून वयोवृद्ध महिलेच्या डोळे पाणायला लागले होते. यादरम्यान महसूल विभागाकडून मोहन राठोड यांनी  चंद्रभागा पांडुरंग लोणारी यांचा झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा केल्याचे समजले