श्रमिक एल्गारचे संपर्क अभियान सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

श्रमिक एल्गारचे संपर्क अभियान सुरूसावली/प्रतिनिधी 
लोकशाहीची लढाई आम्ही निर्धाराने लढवू आणि जिंकू! असा आशावाद व्यक्त करीत श्रमिक एल्गारच्या दोनशेवर युवक व महिलांनी आज पासून आगष्ट संपर्क अभियान सुरू केले.  दहा दिवस चालणाऱ्या या अभियानात श्रमिक एल्गार चे कार्यकर्ते सावली, सिंदेवाही ब्रह्मपुरी, तालुक्यातील "प्रत्येक गावात प्रत्येक घरात" श्रमिक एल्गार चे कार्य आणि विचार पोहोचण्याचा काम करणार आहेत.  यासाठी श्रमिक एल्गारने 60 प्रमुखांच्या नेतृत्वात टीम तयार केली असून प्रत्येक टीम मध्ये ४ ते ५ कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते दहा दिवस,  प्रत्येक गावात शहरात जाणार आहेत.  श्रमिक एल्गारने मागील २० वर्षात केलेले काम,  अहवाल, प्रचार पत्रके, स्टिकर, विशेष पुरवणी यांचे माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहेत.  आज सावली येथे नाग विदर्भ चरखा संघाच्या प्रांगणात सर्व प्रचारक एकत्र झाले आणि सावली तालुक्यात तील नियोजित गावात जाऊन संपर्क अभियानाला सुरुवात केले. या दहा दिवसात श्रमिक एल्गारच्या कार्यकर्त्यांची प्रत्येक गावात राहण्याची आणि जेवणाची सोय श्रमिक एल्गारच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली असून हा अभियान यशस्वी करण्यासाठी अॅड.  पारोमिता गोस्वामी यांचे मार्गदर्शनात संघटनेचे महासचिव घनश्याम मेश्राम व त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहेत