उमरेड तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

उमरेड तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

हळदगाव , वडद , चिमणाझरी , पेंढरी व  तालुक्यात इतर गावात  पूरस्थिती 
        
  चांपा./अनिल पवार :
सकाळी ८वा  वाजता पासून असलेल्या संततधार पावसामुळे उमरेड तालुक्यातील संपूर्ण  जनजीवन विस्कळीत झाले .येथील महामार्ग सह गावांना जोडणारे रस्ते,नदी , नाल्यावर पूर आल्याने काही गाव संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत .

नदी नाल्यांना पूर आल्याने शाळकरी मुला-मुलीना पुराचा फटका सहन करावा लागला .शिवाय वाहतुकीवर मोठा परिणाम झाला .पुराचे पाणी शेतात शिरल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .


उमरेड तालुक्यातील मटकाझरी चिमणाझरी वडद ते नागपुर मार्गावरील नदीला पाच फूट उंचपर्यंत पाण्याचा पूर आल्याने या भागातील काही गावाचा संपर्क तुटला तर वडद  गावातील पन्नास पेक्षा जास्त नागरीक, व कर्मचारी शुक्रवारी कामावरून घरी परत येताना नदीकाठच्या झाडाखाली उपाशी पोटी अडकले. 

 वडद नदीला मोठा पूर आल्याने नागपुरच्या वेगवेगळ्या कंपनीत काम करणारे  कर्मचारी व भाजीपाला विक्रीसाठी नेणारे शेतकरी असे अंदाजे पन्नास पेक्षा जास्त जण पहाटेपासून अडकून पडले .उमरेड तालुक्याच्या उत्तरेकडील भागात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली .असून वडद गावातील शेतकरी सह कर्मचारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उमरेड तालुक्यात नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत . 

आधिच पावसामुळे व इतर नदीनाल्यांचे पाणी त्यात शिरल्याने पूरामुळे तालुक्यातील 100%टक्के विहिरी तलाव नदीनाले भरून ओव्हर फ्लो वाहत आहेत .आसपासच्या शेतातही पाणी शिरले .

शेतातले पाणी हळदगावात शिरल्याने संपूर्ण परिषर जलमय  झाला .हळदगावात तिन दिवसांपासून पूरस्थिती असल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले  घरात पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली .

पहाटे पासून संततधार पाऊस सुरू असल्याने उमरेड तालुक्याला पार झोडपून काढले .हळदगावात पुन्हां पूरस्थितीमुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने लोकांना  पाण्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळाले . पेंढरी येथे घरात पाणी शिरल्याने मातीचे  तिन घर कोसळले सुदैवाने मोठी जीवितहानी टळली . 


तालुक्यात काही गावात मातीच्या घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड होण्याची भीती निर्माण झाली आहे.त्याचबरोबर अन्न धान्य कपड्यांची नासधूस मोठया प्रमाणात झाली आहे.काही गावात मातीच्या घरांचे नुकसान मोठया प्रमाणात होण्याची शक्यता आहे .