दिवाळी होत पर्यंत कोणत्याही चंद्रपूरकराची वीज कापू नये - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

२६ ऑक्टोबर २०१९

दिवाळी होत पर्यंत कोणत्याही चंद्रपूरकराची वीज कापू नये


चंद्रपूर/ललित लांजेवार:
फेरीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध होत पर्यंत त्रास देऊ नये पहिल्याच दिवशी असे निर्देश दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित किशोर जोरगेवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत दिवाळी साजरी होत पर्यंत कोणत्याही चंद्रपुर करांची वीजवाहिनी कापू नये असे निर्देश महावितरणच्या अभियंत्यांंना शनिवारी दिले.

सध्या दिवाळीचे दिवस चालू आहेत असे असताना काही परिवारात अनेक अडचणी असतात त्यामुळे ते विद्युत बिल वेळेवर भरू शकत नाही त्यामुळे महावितरण विद्युत वाहिनी कापण्याचा प्रयत्न करते मात्र दिवाळी होत पर्यंत कोणाचीही वीज वहिनी कापू नये व चंद्रपूरकरांची दिवाळी अंधारात जाईल असे काम करू नये,यासाठी सामान्यांच्या नेत्याने असे निर्देश महावितरणला दिले.