चंद्रपुर;निवृत्त वेकोली कर्मचाऱ्याचा खुन, आरोपी फरार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

चंद्रपुर;निवृत्त वेकोली कर्मचाऱ्याचा खुन, आरोपी फरार

 चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुरात त्रिकोणी प्रेमसंबंधातून भर दिवसा एका 23 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी चंद्रपुरात आणखी एका हत्येची घटना समोर आली. 

शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील श्यामनगर येथे वेकोलि कर्मचाऱ्याची अज्ञात आरोपीने हत्या केली, सपन हलदर (७०) रा. श्यामनगर, चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.

श्यामनगरातील घरी मागील काही महिन्यांपासून ते एकटेच वास्तव्यास असल्याची माहिती आहे.त्यांची मुले चामोर्शी तालुक्यात राहातात. मंगळवारी सकाळी ते घराबाहेर न दिसल्याने शेजारच्या नागरिकांना संशय आल्याने काही नागरिकांनी त्यांच्या घरी जाऊन बघितले असता सपन हलदर हे रक्ताने माखले होते.

सोमवारी रात्री अज्ञात आरोपींनी घरात प्रवेश करून धारदार शस्त्रांनी हलदार यांच्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीदरम्यान स्पष्ट झाले

या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. 

एकाच आठवळ्यात दुसरी हत्येची घटना शहरात घडल्याने पोलीस यंत्रणा चांगलीच हादरली आहे. या घटनांमुळे नागरिक चांगलेच भयभीत झाले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.