जोरगेवारांच्या कार्यालयाबाहेर शेकडो समर्थकांचा जमावळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

जोरगेवारांच्या कार्यालयाबाहेर शेकडो समर्थकांचा जमावळा

जोरगेवारांच्या कार्यालयाबाहेर शेकडो समर्थकांचा जमावळा


जोरगेवार यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह

जोरगेवारांचे तळ्यात मळ्यात संपता संपेना


संडे मार्केट येथील ७०० दुकानदारांचे किशोर जोरगेवार यांच्या नावाला समर्थन 


'तुम्ही निवडणूक लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' असा विश्वास आज संडे मार्केट येथील ७०० दुकानदारांनी यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांना दिला आहे. आज (रविवार) चंद्रपूर येथील आंबेडकर पुतळा येथे किशोर जोरगेवार यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सत्कारासाठी किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती तसेच संडे मार्केटचे अध्यक्ष राजा शेख, इर्शाद शेख, रामगोपाल पांडे, हमीद भाई, श्रावण भारती, किरण ताई, रमाबाई यांच्या सह शेकडो मान्यवर उपस्थित होते. यावेळी तेथील दुकानदारांनी वरील नारा देत किशोर जोरगेवार यांच्या नावाला समर्थन दिले. 

संडे मार्केट असोशिएशन तर्फे किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला. आम्ही तन, मन आणि धनाने तुमच्या पाठीशी आहोत तसेच तुम्हालाच निवडून देवू असा विश्वास संडे मार्केटमधील दुकानदारांनी यावेळी किशोर जोरगेवार यांना दिला. किशोर जोरगेवार यांनी जनतेसाठी काम केले आणि जनतेला देखील हे माहित आहे. मात्र काही राजकीय घडामोडींमुळे त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे तरी देखील तुम्ही पुढे जा आम्ही तुम्हाला पूर्ण पाठींबा देवू असे येथील दुकानदारांनी म्हटले आहे. 


किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरात अनेक महत्वाचे आंदोलन आणि जनहितार्थ मोर्चे काढले. चंद्रपूरकरांसाठी त्यांनी खरोखर लोकसेवा केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोत अशा भावना यावेळी येथील दुकानदारांनी व्यक्त केल्या.