जोरगेवार यांना तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्याचे टॉवरवर चढून वीरूगिरी आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

जोरगेवार यांना तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्याचे टॉवरवर चढून वीरूगिरी आंदोलन


चंद्रपूर प्रतिनिधी:

यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले किशोर जोरगेवार यांना काँग्रेस पक्षाने चंद्रपूर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर किशोर जोरगेवार 

यांच्या समर्थनार्थ एक व्यक्ती चंद्रपूर येथील बागला चौक स्थित बीएसएनएलच्या टॉवरवर चढून वीरू गिरी आंदोलन सुरू केलेले आहे. रात्र झाली असल्यामुळे हे या व्यक्ती स्पष्टपणे दिसू शकत नसून परिसरात मोठी गर्दी जमली आहे.

मिळालेल्या माहिती वरुन रुपेश पांडे व नरेंद्र मडावी असे या टॉवरवर चढलेल्या युवकाचे नाव आहे. खाली उपस्थित लोकांपैकी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असून तो ऐकायला तयार नाही त्याबरोबर चढल्यानंतर वरूनच किशोर जोरगेवार यांना सीट द्या अशी मागणी करत आहे सदर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त तैनात केला असून त्याला खाली उतरवण्यासाठी काय करता येईल याचे प्रयत्न सुरू केले आहेत.