जोरगेवारांच्या हाती लागला काँग्रेसचा AB फार्म - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०४ ऑक्टोबर २०१९

जोरगेवारांच्या हाती लागला काँग्रेसचा AB फार्मललित लांजेवार/नागपूर:
भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या व नंतर स्वतंत्र होंत काँग्रेसवासी झालेल्या यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले किशोर जोरगेवार यांच्या हाती अखेर काँग्रेसच्या खात्यातून AB फार्म मिळाला.

सोमवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.या प्रवेशामुळे जोरगेवार यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र दिल्लीत तीन दिवस तळ ठोकून बसल्यानंतर ही जोरगेवार यांना काँग्रेस कडून तिकीट न मिळाल्याने नाराज जोरगेवार चंद्रपूर येथे परतले त्यानंतर चंद्रपूर विधानसभेची जागा पार्सल उमेदवार महेश मेंढे यांना देण्यात आली होती.

उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपासून तर उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी दुपारपर्यंत अपक्ष असलेले जोरगेवार यांनी यू-टर्न घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाउमेदवारी दाखल करण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेस पक्षाने शेवटची यादी काढत महेश मेंढे यांचे नाव चंद्रपूर साठी निश्चित केले होते.त्यामुळे नाराज झालेले किशोर जोरगेवार यांनी तत्काळ निर्णय घेत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता.जोरगेवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन रीतसर अर्ज भरला. जोरगेवार गेल्या 2 टर्म पासून आमदारकीचे स्वप्न पाहत आहेत मात्र त्यांना पाहिजे त्या प्रमाणात कोणताच पक्ष सिरीयसली घेण्यासाठी तयार नव्हता.मात्र जोरगेवार यांची वाढती लोकप्रियता पाहून शेवटी काँग्रेसच्या अध्यक्षांना देखील जोरगेवार यांची दखल घ्यावी लागली. अन ऐनवेळी जोरगेवार यांना देव पावला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत महेश मेंढे यांच्या हाती एबी फॉर्म लागलेला नसल्याकारणाने मेंढे उमेदवारी दाखल करू शकले नाही. मेंढे यांना सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ देण्यात आली होती तर किशोर जोरगेवार यांना दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेळ देण्यात आली असल्याची माहीती आहे.

2014 च्या निवडणुकीत महेश मेंढे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेली कॉंग्रेसच्याच तिकिटावर पराभूत झाले होते. ऐन वेळेवर फासा पलटला अन काँग्रेसच्या या निर्णयामुळे महेश मेंढे यांना चांगलाच धक्का बसलेला आहे.

खासदार धानोरकर व आमदार वडेट्टीवार हे दोघेही जोरगेवारसाठी पूर्वीपासून आग्रही होते.मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांना कोणीतरी पिन दिल्या कारणाने जोरगेवार यांचे नाव यादीतुन बाद झाले. तर खासदार धानोरकर यांनीदेखील पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना आमच्या मतदार संघातील निर्णय आम्हाला घेण्याचे अधिकार देण्यात यावे अशी विनंती केली होती.मात्र वरिष्ठांनी ही विनंती मान्य केली नाही. धानोरकर यांनी जर आमच्या मतदार संघात निर्णय आम्हाला घेण्याचे अधिकार नसतील तर राजीनामा देण्यास तयार आहोत अशी देखील चेतावणी दिली असे माध्यमातून समजते,

या संपूर्ण घटनाक्रमात मागील तीन दिवसात जोरगेवार यांच्या बाजूने वेगवेगळा घटनाक्रम दिसून आले काँग्रेसकडून सीट न मिळाल्याने गुरुवारी रात्री चंद्रपूर येथील बागला चौक परिसरात दोन युवक टॉवरवर चढून बसले, या घटनेनंतर रात्री दोन वाजेपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तर एका युवकांने जोरगेवार यांना सीट न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचे प्रसारमाध्यमांकडे सांगितले होते. जोरगेवार यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या काढलेल्या रॅलीत काँग्रेसचे झेंडे दिसल्याने चंद्रपूरकर मात्र संभ्रमात होते. 

उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी दुपारनंतर किशोर जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांनी जोरगेवार यांना काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला असल्याचे सर्वत्र सांगितले .हीच माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी देखील सांगितली. मात्र महेश मेंढे यांनी काँग्रेसच्याच एबी फॉर्मवर  उमेदवारी दाखल केली.त्यामुळे एकाच पक्षाचे दोन एबी फॉर्म कसे असा संभ्रम सगळीकडे सुरू आहे. व सध्या चंद्रपूर शहरात देखील याच चर्चेला उधाण आलेले आहेत. या दोन एबी फॉर्म च्या आलेल्या उधानातला कायदेशीर काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयातून आलेला एबी फॉर्म कोणता? व तो कोणाच्या हाती लागला हे येणाऱ्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

अचानक जोरगेवार यांच्या हाती लागलेला AB फॉर्म सकाळी चंद्रपूरात दाखल होऊन होता त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काही वेळा अगोदर हा फॉर्म तिसऱ्या व्यक्तीमार्फत जोरगेवार यांच्या पर्यंत पोचवण्यात आला.

काय आहे 'एबी फॉर्म'?
एबी फॉर्म' हा पक्ष आणि त्या पक्षाचे अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.
ए फॉर्म' हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे.

ए फॉर्म'वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.

'बी फॉर्म' हा अधिकृत उमेदवारासंदर्भातील दस्तावेज आहे.
'बी फॉर्म'वर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचे नावं असते. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करु शकतो.

उमेदवारी अर्ज भरताना सर्वच गोष्टी अगदी काटेकोरपणे तपासल्या जातात. त्यात 'एबी फॉर्म' हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. उमदेवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला 'एबी फॉर्म' द्यावाच लागतो. तो 'एबी फॉर्म' सादर करु शकला नाही तर त्याचा दावा न्यायालयही ग्राह्य धरत नाही.