महावितरण कर्मचा-यांना मारहाण करणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०७ नोव्हेंबर २०१९

महावितरण कर्मचा-यांना मारहाण करणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दाखलनागपूर/प्रतिनिधी:
वीजबिलापोटी थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या महावितरण कर्माचा-यांना शिविगाळ व मारहाण करण्यासोबतच त्यांच्या अंगावर दुचाकी वाहन चढविण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींविरोधात अखेर भा.दं.सं. च्या कलम 353, 504, 506 व 186 अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवार (दि. 4) महावितरण कर्मचारी मुनेश्वर कापसे व राहुल मेश्राम हे कंत्राटी वसुली कर्मचारी अक्षय परासकर यांचेसोबत भालदारपुरा येथील बडा मस्जिद परिसरातील अब्दुल्लाबेग चमूबेग या ग्राहकाकडील सुमारे 1 लाख 55 हजाराची थकबाकी असल्याने त्या घरी गेले असता तेथे उपस्थित असलेल्या महिलेला त्यांनी थकबाकीबाबत माहिती दिली व अर्धा तास वाट बघितल्यानंतर काहीही प्रतिसाद न मिळाल्याने तेथील वीजपुरवठा खंडित करून दुस-या ग्राहकाकडे कारवाईसाठी गेले असता परवेज खान या आरोपीने या वीज कर्मचा-यांना शिविगाळ करून मारहाण केली, 

याशिवाय या मुनेश्वर कापसे या वीज कर्मचा-यांच्या अंगावर दुचाकी वाहन चढविण्याच्या प्रयत्न केला. त्यामुळे ते खाली पडल्यानंतर त्यांना परत मारहाण करीत बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी गणेशपेठ पोलीसांनी भा.दं.सं. च्या कलम 323, 504 व 506 या कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी दोषींविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करून त्यचेवर कठोर कारवाई व्हावी यासाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके आणि कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडे याबाबत पाठपुरावा केला,

 अखेर बुधवार (दि.6) ला या आरोपीविरोधात शासकीय कामकाजात अडथळा करणे, मारहाण करणे, शिविगाळ करून सार्वजनिक शांतता भंग करणे या आरोपाखाली आरोपींविरोधात भा.दं.सं. च्या कलम 353, 504, 506 व 186 अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने केलेल्या या सहकार्याबद्दल महावितरणने त्यांचे आभार व्यक्त केले असून महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही.

 मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.