देखभाल व दुरुस्तीसाठी कॉग्रेसनगरच्या काही भागात बुधवारी वीज नाही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०५ नोव्हेंबर २०१९

देखभाल व दुरुस्तीसाठी कॉग्रेसनगरच्या काही भागात बुधवारी वीज नाही

नागपूर/प्रतिनिधी:

महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागातील वीज वितरण यंत्रणेच्या महत्वापुर्ण देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी बुधवार दि. 6 नोव्हेंबर 2019 रोजी चिंचभवन, सिताबर्डी, टेलीकॉमनगर, सुभाषनगर, धरमपेठ, पांढराबोडी, अमरावती रोड, एकात्मतानगर आदी भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहीती महावितरणतर्फ़े देण्यात आली आहे. 

देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी सकाळी 8 ते 11 या वेळेत पांडे लेआऊट, योगक्षेम लेआऊट, खामला चौक, न्यू स्नेहनगर, बर्डी मेन रोड, महाजन मार्केट, अन्सारी रोड, लोहा पूल, शनि मंदिर, आनंद टॉकीज, टेकडी रोड, गणेश मंदिर आणि जवळपासचा परिसर, रवींद्रनगर, पायोनियर सोसायटी, स्वरूपनगर, गावंडे लेआउट, फ्रेंड्स कॉलनी, सुभाषनगर, तुकडोजीनगर, कामगार कॉलनी, नाईक लेआऊट, हिंगणा रोड, शास्त्री लेआऊट, अध्यापाक लेआऊट, जयताळ रोड, प्रियदर्शिनी मुलीचे वसतिगृह, अतिरीक्त पोलीस उपमहा संचालक (वायरलेस), धरमपेठ, खरे शहर, भगवाघर, टांगास्टँड, वेस्ट हायकोर्ट रोड, अलंकार टॉकीज, शंकरनगर, दंडीगे लेआउट, भगवाघर लेआउट. तेलंगखेडी, मारारटोली, रामनगरचा काही भाग व अमरावती मार्गाच्या काही भागातील वीजपुरवठा खंडित राहील याशिवाय एकात्मता नगर पूजा लेआउट, दादाजीनगर, पक्कीडे लेआउट, ऑरबीट एम्पायर व राधेश्याम नगर या भागातील वीजपुरवठा सकाळी 8.30 ते 11 या वेळेत बंद राहील. 

महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजपुरवठा बंद राहणार असल्याची आगाऊ सुचना मोबाईल एसएमएसच्या माध्यमातून देण्यात आली असून ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.