भामरागडच्या आदिवासी बांधवाचा चंद्रपूर किल्ला पर्यटन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०८ नोव्हेंबर २०१९

भामरागडच्या आदिवासी बांधवाचा चंद्रपूर किल्ला पर्यटन
स्थानिक आदिवासी बांधवाकरिता - लोकबिरादरी प्रकल्प, इको-प्रोचा उपक्रम

चंद्रपूरः गडचिरोली जिल्हयातील भामरागड तालुक्यातील आदीवासी बांधवाची लोकबिरादरी प्रकल्प व इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने चंद्रपूर शहरातिल ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला व ऐतिहासिक वास्तु पर्यटनांचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रपूर जिल्हयात आदीवासीचा वारसा असलेला गोंडकालिन इतिहासाचे साक्षीदार अनेक वास्तु येथे आहेत. आज गडचिरोली जिल्हातिल डाॅ. प्रकाश आमटे यांचे कार्यस्थळ असलेले लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यामाने आदीवासी गांवाकरिता अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. लगतच्या घनदाट जंगलाच्या आतिल भामरागड तालुक्यातिल दुर्गम गाव असलेले ‘कोडपे’ व ‘तिरकामेटटा’ या गावातील गावकरी यांची आज सहल चंद्रपूर शहरात किल्ला पर्यटनासाठी आलेली होती. यांसदर्भात इको-प्रोच्या पुरातत्व विभागच्या वतीने या सर्व आदीवासी बांधवाना चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वारसा आणी त्यांचा इतिहासाची माहीती यावेळी देण्यात आली.

चंद्रपूर पर्यटनासाठी आलेल्या आदीवासी बांधवाना चंद्रपूर शहराचा वैभवशाली गांेडकालीन इतिहास आणी विवीध गोंडराजे यांची माहीती देण्यात आली तसेच पठाणपुरा गेट, बगड खिडकी जवळील देखना बुरूज, रामाळा तलाव व किल्लावरून दिसणारे विहंगम दृष्य, गोंडराजे समाधीस्थळ, येथिल प्राचीन पुरातन विहीर, अंचलेश्वर मंदीर व महाकाली मंदीर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत या संपुर्ण वास्तुचा इतिहास इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी सर्व उपस्थित आदीवासी बांधवाना सांगीतला. हा संपुर्ण इतिहास ऐकुन आदीवासी बांधव हरकुन गेले, त्यांनी उपक्रमाचे मनापासुन स्वागत केले. इतके वर्षापासुन हा वारसा असुन आम्ही अजुन बघितला नव्हता यांची खंत सुध्दा व्यक्त केली.

या संपुर्ण उपक्रमाचे आयोजन लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे आणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केले होते. यामुळे चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा हेमलकसा सारख्या दुर्गम भागातील आदीवासी बांधवाना जवळुन बघता आला, अनुभवता आला. इको-प्रो संस्थेचे अनिल अडगुरवार, अमोल उटटृलवार, सुनिल पाटील व सचिन धोतरे सहभागी होते.