चंद्रपूर:साडेसात वर्षापासून महिला राज; महापौरपदाकरिता तीन अर्ज दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

चंद्रपूर:साडेसात वर्षापासून महिला राज; महापौरपदाकरिता तीन अर्ज दाखल


चंद्रपूर/प्रतिनिधी:
शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाकरिता तीन उमेदवार रिंगणात असून यात राखीताई कांचार्लवार, कल्पना लहामगे, सुनिता लोढिया यांनी नामांकन दाखल केले.

उपमहापौर पदाकरिता दीपक जयस्वाल अशोक नागापुरे आणि अनिल रामटेके राहुल पावडे आणि सचिन भोयर यांनी अर्ज दाखल केले आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिका महापौर पदाकरीता सौ राखीताई कांचार्लवार यांनी दोन अर्ज दाखल केले असून त्या यापूर्वीही महापौर होत्या व उपमहापौर पदाकरीता विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. विद्यमान महापौर अंजलीताई घोटेकर यांची पुन्हा वर्णी लागणार असल्याची शक्यता होती. त्यांनी आपण पुन्हा येणार अशी घोषणाही केली मात्र त्यांनी अर्ज दाखल केला नाही. उलट राखीताई कंचर्लावार यांच्या नामांकन दाखल करतेवेळी त्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. 

महिल राज साडे सात वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या महानगरपालिकेचे महानगरपालिकेत स्थापनेपासूनच महिला महापौराचे राज सुरू आहे. काँग्रेसच्या संगीता अमृतकर यांच्या रूपाने चंद्रपुरच्या महानगरपालिकेत पहिल्यांदाच महिला महापौर बसल्यानंतर राखी कंचर्लावार आणि विद्यमान महापौर अंजलीताई घोटेकर प्रत्येकी अडीच वर्ष कार्यकाळ पूर्ण केला आहे