अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
सिंदेवाही- सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या वासेरा बिटातील सिंगळझरी येथील एका इसमावर अस्वलाने अचानकपने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले. सुधाकर शालीक लोणारे वय- ४५ रा. सिंगळझरी असे जखमी इसमाचे नाव आहे. सदर घटना गुरूवार दि. २८ नवम्बर २०१९ ची आहे.
सुधाकर लोणारे हा सकाळी काही व्यक्तींसोबत सरपन गोळा करण्याकरीता शेतशिवारात गेला होता त्यादरम्यान अस्वलाने लोणारे यांच्यावर अचानक हल्ला केला. मात्र सोबत असलेल्या सहका-यांनी त्या अस्वलाला पिटाळुन लावले त्यामुळे लोणारे हे थोडक्यात बचावले यात लोणारे जखमी झाले. जखमीला आरोग्य केंद्र वासेरा येथे प्राथमिक उपचार करुन ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही हलविण्यात आले . घटनेची माहिती वनविभाग शिवनी यांना मिळताच क्षेत्रसाहाय्यक एस. बी. उसेंडी, वनरक्षक टापरे, मेश्राम, यांनी घटनेचा पंचनामा केला.

 सदर घटनेची माहिती मिळताच मि व माझी टीम आरोग्य केंद वासेरा येथे जखमी इसम लोणारे यांच्या प्रकृतीची विचारपुस करुन घटनेचा पचंनामा करण्यात आला, सध्या लोणारेची प्रकृती ठीक आहे.
-क्षेत्रसहाय्यक एस. बी. उसेंडी