महानिर्मितीच्या भुसावळ ६६० मेगावाट वीज प्रकल्प बाष्पक उभारणीस प्रारंभ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

महानिर्मितीच्या भुसावळ ६६० मेगावाट वीज प्रकल्प बाष्पक उभारणीस प्रारंभ

जळगाव जिल्ह्याच्या विकासात भर घालणारा प्रकल्प
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्थानिकांना रोजगाराच्या संधी
नियोजित कालावधीच्या आत प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय
नागपूर/प्रतिनिधी:
हानिर्मितीच्या १x६६० मेगावाट क्षमतेच्या सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित भुसावळ विस्तारित वीज प्रकल्पात २२ नोव्हेंबर रोजी संच क्रमांक ६ बाष्पक स्तंभ उभारणीच्या कामाचा शुभारंभ महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) वी.थंगपांडियन यांचे शुभहस्ते संपन्न झाला. 

याप्रसंगी महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(प्रकल्प) संजय मारुडकर, मुख्य अभियंते विवेक रोकडे, अनंत देवतारे, विठ्ठल खटारे, पंकज सपाटे, मेसर्स भेल तसेच महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बाष्पक उभारणीचे काम हे नियोजित कालमर्यादेच्या सुमारे आठ दिवस अगोदर सुरु झाले. यापूर्वी, टर्बोजनरेटर स्ट्रक्चर उभारणीच्या कामास १९ नोव्हेंबर रोजी सुरुवात करण्यात आली व हे काम देखील नियोजित काल मर्यादेच्या आतच सुरु करण्यात आले आहे. भुसावळ येथील ६६० मेगावाट क्षमतेचा हा संच महानिर्मितीचा चवथा संच असून यापूर्वी ६६० मेगावाट क्षमतेचे तीन संच कोराडी येथे कार्यरत आहेत. 
सध्यस्थितीत प्रकल्पस्थळी स्थापत्य स्वरूपाची प्राथमिक कामे मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहेत. महानिर्मितीच्या ह्या महत्वाकांक्षी वीज प्रकल्पाची कामे दर्जेदार मानकांसह गतिमानतेने पुढे नेण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन व पाठपुरावा करण्यात येत असून नियोजित काल मर्यादेच्या आत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस संचालक(प्रकल्प) वी.थंगपांडियन यांनी व्यक्त केला. 

भुसावळ येथील विस्तारित वीज प्रकल्पाचे भूमीपूजन तत्कालीन ऊर्जामंत्री यांचे शुभहस्ते ३० मार्च २०१८ रोजी करण्यात आले. प्रकल्प उभारणीचे काम मेसर्स भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांना देण्यात आले असून प्रकल्पासाठी ११६.०९ हेक्टर जमीन, ३.१८ दशलक्ष मेट्रिक टन कोळसा प्रतीवर्ष तर सुमारे १८.८५ दशलक्ष घनमीटर पाणी प्रतिवर्ष तापी नदीतून घेण्यात येणार आहे. ह्या प्रकल्पाची शून्य तारीख ३१ डिसेंबर २०१८ असून प्रकल्पाची किंमत रु.४५५०.९८ कोटी इतकी आहे. सुमारे ४२ महिन्यात म्हणजेच जून २०२२ ला हे काम पूर्णत्वास येणार आहे. 

राज्याची आगामी काळातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता ह्या वीज प्रकल्पाला अनन्यसाधारण महत्व आहे. सध्यस्थितीत भुसावळ येथे २१० मेगावाट क्षमतेचा एक संच आणि ५०० मेगावाट क्षमतेचे दोन संच कार्यरत असून येथील स्थापित क्षमता १२१० मेगावाट इतकी आहे.