रिच – ४ करिता २३९३ अखेरचे सेगमेंट बनविण्याचे कार्य सुरु - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    Create Your Dream Website  

💻 Create a beautiful, modern website

with all the features you need for your industry. 

          News Portals/ Website -   📞 Call- 7264982465      

०४ नोव्हेंबर २०१९

रिच – ४ करिता २३९३ अखेरचे सेगमेंट बनविण्याचे कार्य सुरुनागपूर ०४: महा मेट्रोच्या सिताबर्डी ते प्रजापती नगर कॉरीडोरचे कार्य जलद गतीने सुरु असून, महा मेट्रो द्वारे भंडारा मार्गावरील आसोली येथील कास्टिंग यार्ड मध्ये रिच – ४ चा अखेरचा सेगमेंट कास्ट करण्यात आला. रिच – ४ मध्ये व्हायाडक्ट करिता दोन पिलरच्या मध्ये  टाकण्यात येणाऱ्या अखेरच्या २३९३ व्या सेग्मेंट बनविण्याचे कार्य सुरु झाले. एका सेगमेंटचे वजन ४५ टन ,रुंदी८.५ मीटर, लांबी ३ मीटर असते. रिच – ४ या एकूण ८.३० की.मी.एवढ्या मेट्रो मार्गावर रूळ बसविण्याचे कार्य सुरु आधिच झाले आहे.
१९ एकरच्या या कास्टिंग यार्डमध्ये व्हायाडक्टच्या निर्माण करण्याची सुरुवात ऑगस्ट २०१७ पासून करण्यात आली. या ठिकाणी सेगमेंट कास्टिंगचे काम नोव्हेंबर २०१९ मध्ये पूर्ण झाले असून आता पर्यत या रिच – ४ मध्ये ७९% व्हायाडक्टचे कार्य पूर्ण झाले आहे. एकीकडे सेगमेंट चे काम पूर्ण झाल्यानंतर आता आय गर्डर व टी-गर्डर तयार करण्यासाठी मेट्रोचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी दिवसरात्र कार्य करीत होते. या कास्टिंग यार्ड मध्ये एका दिवसाला सर्व साधारणपणे सहा सेगमेंट तयार केले जातात.

अत्याधूनिक मशिनच्या साहाय्याने हे कार्य पूर्ण करण्यात आले असून,दररोज कार्य सुरु करण्यापूर्वी सुरक्षेच्या नियमाविषयी कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली.  सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.३० किमीच्या या मार्गावर एकूण ०९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे. या मार्गीकेवरील प्रवासी सेवा सुरु झाल्यावर मेयो हॉस्पिटल,रेल्वे स्थानक,कॉटन मार्केट,इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल.