यूएमआइ २०१९: नागपूर मेट्रोच्या वैशिष्ट्यांची दुर्गाशंकर मिश्रा यांनी केली प्रशंसा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

यूएमआइ २०१९: नागपूर मेट्रोच्या वैशिष्ट्यांची दुर्गाशंकर मिश्रा यांनी केली प्रशंसा
  • महामेट्रोच्या 'नॉन फेयर बॉक्स रेव्हेन्यू' प्रणालीवर झाली चर्चा

नागपूर, १७ नोव्हेंबर २०१९: लखनऊ येथे आयोजित १२व्या 'अर्बन मोबिलिटी इंडिया २०१९' (यूएमआइ) परिषदेच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवशी झालेल्या गोलमेज चर्चासत्रात नागपूर मेट्रो प्रकल्पातील वैशिष्ट्यांवर सादरीकरण करण्यात आले. यात प्रामुख्याने मेट्रोचा खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढवता येईल यावर चर्चा झाली.   

महा मेट्रोतर्फे नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या सोलर पॅनल, स्टॅम्प ड्युटी आणि ट्रान्सीट ओरिएंटेड डेव्हलपमेंट प्रणालीवर सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर केंद्रीय शहरी विकास सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाची प्रशंसा महा मेट्रोने अमलात आणलेल्या या प्रणालीचा इतर मेट्रो प्रकल्पातही कसा वापर होऊ शकेल? भविष्यात कश्याप्रकारे याचा अधिक लाभ मिळू शकेल यावर विचार व्यक्त केले. 

उल्लेखनीय आहे की, महा मेट्रोने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मेट्रोचे प्रवासी दर कसे कमी करता येईल व पर्यावरणाचे संतुलन राखत ज्यास्तीत ज्यास्त नागरिकाने मेट्रोचा वापर करावा यासाठी मेट्रोचे प्रयत्न परिषदेत मांड्यात आले. प्रवासी दर कमी करण्यासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी महा मेट्रोने 'नॉन फेयर बॉक्स रेव्हेन्यू' प्रणाली अमलात आणली आहे. 

लखनऊच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे १२व्या 'अर्बन मोबिलिटी इंडिया २०१९' परिषदेची आज रविवारी सांगता झाली. परिषदेच्या समापन समारोहात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मा. श्री. दिनेश शर्मा आणि उत्तर प्रदेशचे नगर विकास मंत्री सुरेश कुमार खन्ना उपस्थित होते. शहरी जीवन कसे अधिक चांगले करता येईल याउद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात येते.