खरोखर बलपण हरवत चाललेय-सचिन गुदगे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

खरोखर बलपण हरवत चाललेय-सचिन गुदगे
मायणी/तालुका खटाव जिल्हा सातारा_-(सतीश डोंगरे) 
बाल दिन नुकताच साजरा झाला खरं तर लहान मुलं म्हटली की डोळ्यासमोर येतो त्यांच्या निरागस चेहरा त्या चेहऱ्यामागे दडलेले खोडकरपणा त्याच सोबत येतात त्यांच्या मनमोकळे जीवन पण या मोबाईलच्या युगात आई-वडिलांना वेळ नाही आजोबा आजी वृद्धाश्रमात त्यामुळे खरच बालपण हरवत चाललंय असं वाटतं त्याचाच एक भाग म्हणून मुलं कुपोषित राहतात कामा नये यासाठी मायणी ग्रामपंचायत मार्फत अंगणवाडी तील तीन ते पाच वर्षातील मुलांना प्रोटीन डब्बा व राजगिरा लाडू नुकतेच युवानेते सरपंच सचिन गुदगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आली मायणी येथील श्रीराम कॉलनी येथील अंगणवाडी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले या प्रसंगी उपसरपंच आनंदा शेवाळे, सदस्य माजी उपसरपंच  सुरज पाटील माजी सरपंच महादेव, दत्तात्रय थोरात, माजी शिक्षणाधिकारी राजकुमार चव्हाण ,इमरान जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी अंगणवाडीसेविका श्रीमती सुनिता माने हिने सध्या सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल आणि मुलांच्या आरोग्याबद्दल माहिती दिली यावेळी इमारत अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी अंगणवाडी मदतनीस विद्या भोंगाळे पालक बाबुराव ढवळे सीमा चौधरी शारदा गाढवे जागृती पाटील सारिका विश्वकर्मा उर्मिला देशमुख अर्चना जाधव अनिता काबुगडे माया शिंदे रुक्मिणी कदम तसेच परिसरातील पालक व पत्रकार उपस्थित होते सुनिता माने यांनी आभार मानले