आग लागून घर खाक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

आग लागून घर खाक


खापा येथील घटना    
खापा /प्रतिनिधी:
 घरातील सर्व लोक कार्यक्रमाला बाहेर गेले असता खापा येथील गडेवाल पु-यातील एका जुन्या घराला शनीवारी रात्री 10 च्या सुमारास लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले. उल्हास अंबरदास बोकडे (70) असे मकान मालकाचे नांव आहे.  

 खापा रहिवासी उल्लास अंबरदास बोकडे हे शनिवार रोजी एका कार्यक्रमा निमीत्य नागपूरला गेले असता रात्री 10 च्या सुमारास अचानक घराला लागलेल्या आगीने घर जळून खाक  झाले. यावेळी उशीरा रात्री खापा न.प. अगिनीशामक दलाने आग विझविली परंतू तोपर्यंत सर्व संपलेले होते.  उल्लास बोकडे यांचे गडेवाल पु-यातील घर हे जुने माती-लाकडाचे असल्याने शाॅटसर्कीट मुळे अचानक धु-धू करून पेटून उठल्याचे बोलल्याजात आहे.आगिचे मात्र नेमके  कारण कळू शकले नाही.

उल्लस बोकडे यांची परिस्थती नाजुक असून मुलगा बेरोजगार आहे तर मुलगी ही सावनेर तहसील कार्यालयात आहे.