पशुधनावर आधारीत कुक्कुटपालन,शेळी पालन,व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

पशुधनावर आधारीत कुक्कुटपालन,शेळी पालन,व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र ही उद्योग संचालनालया अंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत प्रशिक्षण संस्था असून या संस्थेचा मुख्य उददेश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त लोकाना स्वत:चा उद्योग, व्यवसाय सूरू करणेकरिता प्रेरित करणे व उद्योजकतेला पुरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे. 


               महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, चंद्रपूर द्वारे ७ वी पास व १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवक युवतीकरीता चंद्रपुर येथे दोन आठवडे कालावधीचे शेळी पालन, दुग्ध व्यवसाय व कुक्कुट पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

                        सदर प्रशिक्षणामध्ये शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी गाय व कोंबडयांची विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतीबंधक उपाय त्याचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलीत आहार जिवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गामार्फात  मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक युवतीनी त्वरीत दि. ०८ जानेवारी २०२० पर्यंत "महाराष्ट उद्योजकता विकास केन्द्र, उद्योग भवन, दसरा माळा, गाळा क्र. २०८, बस स्टॉप समोर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपुर" येथे स्वत:चा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर


 रहाण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी मउविके, चंद्रपूर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी के व्ही. राठोड, प्रकल्प अधिकारी, मो.न. ९४०३०७८७७३. ०७७२-७४१ व मिलिंद कुंभारे, कार्यक्रम आयोजक, मो. न. ९०११६६७७१७. दिपाली जाजर्ले. कार्यक्रम आयोजिका, मो. न. ९८६०६००३०१ याच्याशी संपर्क साधावा.