चितेगाव येथे शुक्रवारपासून पर्यावरण परिषद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

चितेगाव येथे शुक्रवारपासून पर्यावरण परिषद


विदर्भातील पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने दाखल होणार


चंद्रपूर/ प्रतिनिधी 
विदर्भ पर्यावरण परिषद, श्रमिक एल्गार तथा एल्गार प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार दिनांक 10 जानेवारी पासून तीन दिवसीय विदर्भ पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. 
२६ व्या विदर्भ पर्यावरण परिषदेचे उद्घाटन दि . १० जानेवारी २०२० रोजी दुपारी २ वाजता ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष, तथा पर्यावरण तज्ञ डॉ . सुरेश चोपणे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एस . व्ही. रामाराव राहतील. 
यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून पुणे जेष्ठ सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ, उत्कांतीशास्त्र तथा वर्तनशास्त्र अभ्यासक डॉ . मिलींद वाटवे संवाद साधतील. 
 विशेष अतिथी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश संघटक हरिभाऊ पाथोडे यांची उपस्थिती राहणार आहे.  पर्यावरण परिषदेची भूमिका समन्वयक लोकमित्र संजय काशिनाथ सोनटक्के मांडतील. 

दुसर्‍या दिवशी शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता पहिले सत्र प्रारंभ होईल. यात परिवर्तन , विकास आणि पर्यावरण यावर  - प्रा . प्रभाकर पुसदकर , समन्वयक ( नई तालीम समिती - सेवाग्राम ) हे मांडणी करतील. 
 दुसरे सत्र - सकाळी ११ वाजता विकास नीती आणि जनमानस यावर मोहन हिराबाई हिरालाल ( वृक्षमित्र , चंद्रपूर ) भाष्य करतील. 
तिसरे सत्र - दुपारी २.३० वाजता स्त्रीवादी दृष्टीकोनातून वंचितांचे पर्यावरणीय प्रश्न - यावर प्रा . श्रीमती धम्मसंगिनी रमागोरख मार्गदर्शन करतील.  
सायंकाळी ४.३० वाजता परिवर्तन , विकास आणि स्थानिकांचे पर्यावरणीय प्रश्न यावर प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, तर चंद्रपूर गोसेखुर्द प्रकल्प : पर्यावरणीय समस्या आणि सद्यास्थिती यावर अॅड . गोविंद भेंडारकर मांडणी करतील. 
रात्री ८ . ३० नंतर - मुक्त चर्चा व स्वानुभव कथन होईल. 
शेवटच्या दिवशी रविवार, दि. १२ जानेवारी सकाळी ९ शाश्वत उर्जा आणि पर्यावरण यावर वेकोलिचे सीजीएम उदयजी कावळे बोलतील. 
दुपारी ११.३० वाजता समारोप सत्र होईल. यात आगामी २७ व्या विदर्भ पर्यावरण परिषदेची दिशा ठरविली जाईल. सत्राध्यक्ष - दिलीपभाऊ गोडे , (नागपूर माजी सदस्य , राज्य वन्यजीव मंडळ) राहतील.  या पर्यावरण परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष विजय सिद्धावार ( उपाध्यक्ष,  श्रमिक एल्गार ) आयोजक अॅड . पारोमिता गोस्वामी ( संस्थापिका श्रमिक एल्गार ) डॉ . जयश्री कापसे - गावंडे (अध्यक्ष, एल्गार प्रतिष्ठान ) यांनी केले आहे.