महालक्ष्मी अनसूया माता ब्रह्मलीन दिनानिमित्त विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

महालक्ष्मी अनसूया माता ब्रह्मलीन दिनानिमित्त विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन           

नागपूर / प्रतिनिधी
        विश्वमोहिनी अनसूया माता (पारडसिंगा निवासिनी) ह्यांच्या शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२० रोजी २२ व्या ब्रह्मलीन दिनानिमित्त मा. ना. अनिल देशमुख (मंत्री महाराष्ट्र शासन), मा. मंत्री रमेशजी बंग,  आमदार प्रकाश गजभिये, गिरीश चंद्रशेखर वऱ्हाडपांडे, मा. आमदार दीनानाथ पडोळे, मा. हरीषजी दुबे (माजी निगम सचिव), माजी आमदार विजय घोडमारे यांना आमंत्रित केले आहे. तसेच सुप्रसिद्ध नकलाकार राजाभाऊ चिटणीस, प्रभाकरराव देशमुख, सौ. इंद्रायणी काळबांडे (सरपंच), हर्षला गौतम मेश्राम, राहुल पांडे, मंगलाताई रडके, सौ. रश्मी कोटगुले, श्री. सुभाष वऱ्हाडपांडे, डॉ. रमेश पाटील, गणेश धानोरकर यांच्या उपस्थितीत अनसूया माता मंदिर, शांती विद्या भवन डिगडोह प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे. 
        सकाळी ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत मातेचे मंगलस्नान, पंडित श्री. भगवान जोशी गुरुजी महाराज व पंडित चंद्रभूषण मिश्रा वेदाचार्य सह पूजा-अर्चना व होमहवन कार्यक्रम होईल.  सकाळी ९.३० वाजता दिंडी सोहळा डिगडोह (देवी) येथे प्रदक्षिणा जगदीश बँड पार्टी देविदास अडांगळे यांच्या मंगलधूनसहीत काढण्यात येईल. सकाळी १०.०० वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येईल. दिलीप पनकुले परिवार आयोजित कार्यक्रमाला आपली सेवा रुजू करावी, ही विनंती.
        दुपारी ११.३० वाजता छप्पनभोग व नैवद्य चढविण्यात येईल. दुपारी १.०० ते ३.०० वेदाचार्य चंद्रभूषण मिश्रा यांचे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.  दुपारी ४.०० ते ६.०० जय दुर्गा भजन मंडळ,  डिगडोह व ६.०० ते ७.३० वाजता मा. दत्ता गणोरकर अनसूया भजन मंडळ आयोजित मंडळाचे भजन होईल. सायंकाळी ७.३० वाजता महाआरती, गोपालकाला व महाप्रसाद वितरण करण्यात येईल. कार्यक्रमासाठी प्राची प्रवीण ढोले, सौ. वैशाली रोहित उपाध्ये, सौ. अनुराधा अनंत खोकले, सौ. सुचिता बाराहाते,  महादेवराव फुके, पी. एस. चौबे, सोपानराव शिरसाट, वसंतराव घटाटे, देविदास घोडे, राजेंद्र आसलकर, तात्यासाहेब मते, प्रा. एस. के. सिंह, विक्रांत तांबे, अॅड. प्रमोद शिंदे, भाईजी मोहोड, प्रदीप अहिरे, अजय धोटे, संजय शेवाळे, विजय पांडे, सौ. श्रुती सुधीर मुलमुले, हेमराज गुडधे, अनिरुद्ध मिश्रा, सरदार रवींद्र मुल्ला, प्रमोद वानकर, बबलू चव्हाण, देविदास अडांगळे, प्रमोद जोंधळे आदी भक्तगण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत._