महिलेच्या डोक्यात दगड घालून सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंबावली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

    आता बनवा आपली स्वस्तात वेबसाईट   

डिजिटल मीडियाच्या माध्यमातून

आपला व्यवसाय, संस्था, उद्योगाची माहिती जगभर पोहचावा. 

          kavyashilp Digital Media -   Call- 7264982465      

महिलेच्या डोक्यात दगड घालून सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंबावली
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला: तालुक्यातील धामणगाव येथील महिलेच्या डोक्यात दगड घालून सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लांबवली
आज भर दुपारच्या सुमारास धामणगाव ता येवला येथील जगताप वस्तीवर दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसम आले चंद्रकला बबन जगताप आपल्या शेतात कांदे कापत असताना दोन्ही अज्ञातांनी सदर महिलेकडे कांद्याचे रोप आहे का अशी विचारणा केली असता सदर महिलेने नकार दिल्याने एकाने चंद्रकला जगताप यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिस्कावली त्याच क्षणी सदर महिलेने प्रतिकार करताच चोरट्यांनी त्या महिलेच्या डोक्यात दगड घालून जबर जखमी केले आणि सोन्याची पोत घेऊन चोरटे पसार झाले सदर जखमी महिलेवर येवला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या बाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे